फळपिकविमा रब्बी हंगामसाठी ई पीक नोंदणी पुर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील सहभागी झालेले फळपिक विमाधारक बंधु-भगिनींनी शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेमध्ये रब्बी हंगाम 2025 साठी दिलेल्या दि. 25 एप्रिल 2025 रोजी अखेरपर्यंत ई पीक पहाणी नोंदणी पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. ई- पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसुल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15ऑगस्ट 21 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'