बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2018 च्या नियम 91 ला अधिन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती अशासकीय 1 अध्यक्ष व 4 सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारानी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील प्रकरण 5 मधील कलम 27 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 15 (1) मध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 चा नियम 90 च्या अन्वये गठीत केलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, 2018 च्या नियम 91 ला अधीन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-1 येथील 1 अध्यक्ष व 4 सदस्य पदे तसेच कोल्हापूर येथील 2 सदस्य, धुळे, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यातील प्रत्येकी 1 सदस्य पदे अशी एकून 10 पदे वगळून उर्वरित सर्व जिल्हातील बाल कल्याण समिती अध्यक्ष, सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह आयुक्तालय, पुणे यांच्याकडून दि. 29/03/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीपासून पुढील 15 दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयात सादर करावेत. तसेच सदरची सविस्तर जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in व आयुक्तालयाच्या http://wcdcommpune.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग पत्ता:-जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारत, ए-विंग, तळमजला दालन क्र 106, ओरोस, सिंधुदुर्गनगरी ०२३६२२२८८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'