इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सन 2024-25 मधील 100 टक्के खर्च
सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा माहे मार्च 2025 अखेर 100 टक्के खर्च करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी दिली आहे.
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43 कामांना प्रशासकीय मान्यता देवून रक्कम रू. 236.00 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे. शिक्षण शाखेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकत असलेल्या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 826 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 16.74 लक्ष इतका निधी तर इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 1 हजार 737 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू.42.25 लक्ष इतका निधी आणि इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्ग 621 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 3.49 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करणे या योजनेंतर्गत 518 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 2.14 लक्ष इतका निधी तर इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 983 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 2.86 लक्ष इतका निधी तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2 हजार 354 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 39.99 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत 142 पात्र विद्यार्थ्यांना 54.93 लक्ष व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत 9 पात्र विद्यार्थ्यांना 2.79 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला असून सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा खर्च 100 टक्के झालेला आहे.
०००००
Comments
Post a Comment