उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कुडाळमध्ये झाली वॉकेथॉन रॅली

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का.) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत ६ किलोमीटर वॉकेथॉनचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने व रोटरी क्लब, कुडाळ, लायन्स क्लब कुडाळ व गिअर अप जिम कुडाळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या वॉकेथॉनचा आरएसएन हॉटेल चौकातून शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याहस्ते फित कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी श्री. काळे म्हणाले, सध्या रस्त्यावर होणाऱ्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनांद्वारे धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. हे अपघात होऊ नयेत, यासाठी रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चालल्याने मागील वाहन दिसत नाही व अपघात होतात. त्यामुळे उजव्या बाजूने चालल्यामुळे पुढून येणारे वाहन दिसते व यामुळे अपघात होणार नाहीत. त्यामुळे लोकांनी चालताना उजव्या बाजूने चालावे व वाहन चालकांनीही रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत. वॉकेथॉन रॅली आरएसएन हॉटेलपासून सुरु करण्यात आली. त्यानंतर कॉलेज चौक, गवळदेव चौक, पोलीस स्टेशन, एस. टी. स्टॅन्ड, आंबेडकर चौक, गुलमोहर हॉटेल, नवीन बस स्टॅन्ड ते पुन्हा आरएसएन चौक अशी मार्गक्रमित करण्यात आली होती. या रॅलीत शेकडो नागरिकांचा सहभाग होता. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी क्लब व लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य, तसेच गिअर अप जिमचे सदस्य, शहर व परिसरातील मोटर ड्रायविंग स्कूल चे प्रतिनिधी, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वॉकेथॉन मध्ये सहभागी सर्व नागरिकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात व सहभागी ज्येष्ठ नागरिकांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'