राष्ट्रीय लोक अदालत ११ फेब्रुवारील

ा सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जि.मा.का.) : राष्ट्रीय लोक अदालतीचे ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आली आहे. या लोकन्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई व वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जाती व जमाती महामंडळ, मुंबई यांची थकीत कर्ज प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली जाणार आहेत. या लोकन्यायालयामध्ये थकीत कर्जदाराने तडजोड करावी व उपरोक्त योजनेतील व्याज सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर यांनी केले आहे. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांजकडील ओबीस महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्याया लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना लागू करण्यात आलेली आहे. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे थकीत असलेले कर्जावरील व्याजामध्ये एक रकनी समझोता (One Time Settlement) योजनेअंतर्गत व्याजामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'