आपदा मित्र' व्दितीय तुकडी प्रशिक्षणाचे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने शुक्रवार दि. १३ जानेवारी रोजी कुडाळ येथील आर एस एन हॉटेल येथे 'आपदा मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३.३० जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेचा असून या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील २०० स्वयंसेवकांना "आपदा मित्र" चे प्रशिक्षण देणेचे आहे. त्यातील ९६ स्वयंसेवकांच्या प्रथम तुकडीस दिनांक १९ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रशिक्षण दिलेले असून १०४ स्वयंसेवकांच्या व्दितीय तुकडीस दिनांक १३ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'