प्रजासत्ताक दिनी सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता कार्यक्रम - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ७३ व्या औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी शासनाच्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली .
सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या कडील परिपत्रकद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.०० वा. स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.०० वा. स्वच्छता कार्यक्रम घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तरी जिल्हावासियांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.नायर यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment