पोलीस भरतीतंर्गत चालक व पोलीस अंमलदार पदासाठी मैदानी चाचणी ११ जानेवारी पर्यंत -पोलीस निरीक्षक संदीप भोसले

सिंधुदुर्गनगरी दि.01 (जि.मा.का): जिल्हा पोलीस दलातंर्गत सोमवार दिनांक २ ते ४ जानेवारी २०२३ कालावधीत चालक पोलीस अंमलदार पदांची मैदानी चाचणी आणि गुरुवार दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२३ कालावधीत पोलीस अंमलदार पदाची मैदानी चाचणी, पोलीस मुख्यालय मैदानावर होणार,असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग दलातंर्गत मैदानी चाचणीसाठी एकुण ८ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चालक पदासाठी २ हजार १२६ अर्ज असून पोलीस अंमलदार पदासाठी ५ हजार ९५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेत पोलीस अंमलदार ९९ पदे आणि चालक पोलीस अंमलदार २२ पदे अशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी सिंधुदुर्ग पोलीस दल येथे भरती प्रक्रीयेसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज भरलेले आहेत त्यांनी महाआयटी कडून प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी ओळखपत्राच्या दोन प्रती आवेदन अर्जाच्या आणि त्यांच्या छायांकित प्रतीचा संच तसेच आवेदन अर्जावर सादर केलेल्या छायाचित्राच्या पासपोर्ट साईजच्या छायाचित्रासह त्यांना बोलविलेल्या दिवशी व वेळेत पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग मैदानावर हजर राहणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'