स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी समजपूर्वक वाचनाचा पाया पक्का आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का.) : अध्ययन कार्ड ही माता पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्याच्या प्रभावी संवाद व समजपूर्वक आकलनासाठी फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी समजपूर्वक वाचनाचा पाया पक्का असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीमार्फत या कार्डाचा आर्थिक भार स्वीकारला जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. निपुण भारत अंतर्गत शरद कृषी भवन येथे निपुण ध्येय 1 व ध्येय 2 या केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्यासाठी संयुक्त कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांमार्फत आयोजित करण्यात आली होती. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या भाषा पंधरवडा कालावधीचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत तयार करुन "कृतीप्रवण स्वयंअध्ययन कार्ड- विषय भाषा" चे अनावरण करण्यात आले. यावेळी कृतीप्रयण स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती करणारे शिक्षक, राज्यस्तरावरील माध्यमिक व प्राथमिक नवोपक्रम स्पर्धेतील विजेते शिक्षक या सर्वांचा श्री. नायर यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी SCERT, पुणे च्या माजी मराठी विभाग प्रमुख लोहकरे, प्राचार्या ए. पी. ताशीकर, डाएट प्रदीप कुडाळकर, शिक्षणाधिकारी (योजना), सुषमा कोडुसकर, अधिव्याख्याता, डाएट, डॉ. एल. बी. आचरेकर, अधिव्याख्याता, डाएट त्याचप्रमाणे लीडरशिप फॉर इक्विटी (LFE) कार्यशाळेचे व्याख्याते अमित गवळे, चैताली, सलिल सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जि.प.शाळा ओरोस खुर्दचे शर्वरी राजाध्यक्ष यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'