सावंतवाडी येथे सोमवारी महिलांसाठी हेल्मेट रॅली

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का.) रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हेल्मेट रॅली, हेल्मेट व सीट बेल्ट वापरणाऱ्यांचा सन्मान, वॉकेथॉन, शाळा महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती, चालकांचे प्रबोधन, चालकांची नेत्र तपासणी, विना अपघात गाडी चालवणाऱ्या चालकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम राबवले जात असून उद्या सोमवार दि. १६ जानेवारीला सावंतवाडी शहरात महिलांसाठी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गाडी चालवताना नियमित हेल्मेट वापरणाऱ्या व सीट बेल्ट वापरणाऱ्या महिला वाहन चालकांचा गौरव करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मोती तलाव, सावंतवाडी येथे सुरु होणाऱ्या या रॅलीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'