कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे घवघवीत यश

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का.) : संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे आयोजित कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने चॅम्पियनशिप चषकासह वैयक्तिक क्रींडा प्रकारात ८ सुवर्ण पदके, ६ रजत पदके व १ कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक क्रीडा प्रकारात क्रिकेट व हॉलीबॉल (शुटींग) यामध्ये विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच सिंधुदुर्ग संघाने संचलनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून सर्व स्तरावरून विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. ही स्पर्धा ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी पालघर येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा एकूण २१ क्रीडाप्रकारांचा व एकल गाणे, दुकल गाणे व समुह नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये कोकण विभागातील कोकण भवन, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी व कलाकारांनी सहभाग दर्शविला होता. यामध्ये सहभागी सर्व खेळाडू व कलाकारांना डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग व स्थानिक निधी व लेखा परीक्षाचे सहाय्यक संचालक बाळासाहेब पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सोबत: फोटो जोडला आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'