मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा -डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणूकीच्या दिवशी सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजुर करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्रान्वये सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतीरिक्त असणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'