तिमाही विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन भरा - इ.सि. शेख
सिंधुदुर्गनगरी दि.03 (जि.मा.का): सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1951 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनेत काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर-1 दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत https://rojgar.mahaswayam.gov.in या बेवसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इ.सि. शेख यांनी केले आहे.
प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाईचे विविरणपत्र ई-आर -1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील अशांनी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362 228835 वर संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment