जिल्हा नियोजन समितीची आज होणारी सभा पुढे ढकलली

सिंधुदुर्गनगरी,दि.4 (जि.मा.का.) जिल्‍हा नियोजन समितीची आज दिनांक 5 जनोवारी रोजी होणारी सभा प्रशासकीय कारणास्‍तव पुढे ढकलण्‍यात येत असून आगामी सभेची तारीख कळविण्‍यात येईल. असे जिल्‍हाधिकारी के.मंजुलक्ष्‍मी यांनी कळविले आहे. जिल्हा नियोजन समितीची सभा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा नियोजन समिती सभागृह (नवीन) जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्‍यात आली होती. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'