नोंदणीकृत धान खरेदी केंद्रावर जावून शेतकऱ्यांनी धान विक्री करावी -जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जि.मा.का.) : खरीप हंगाम २०२२-२३ मधील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान विक्रीसाठी आनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जानेवारी अखेर ज्या धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे. त्या धान खरेदी केंद्रावर जावून धान (भात) विक्री करावयाची आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी दिली आहे. खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंअंतर्गत जिल्ह्यातील ३९ धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी सुरु आहे. त्यांचा तालुकानिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे. सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड,डेगवे, तळवडे, भेडशी,इन्सुली मडुरा. कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- कुडाळ, पिंगुळी, माणगाव, कडावल, आंब्रड, घोडगे, गोठोस, कसाल, वेताळ बांबार्डे, पणदुर, तुळस, निरुखे, निवजे, फोंडा. मालवण तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- पेंडूर, गोठणे. वेंगुर्ला तालुका खरेदी- विक्री संघामार्फत- वेंगुर्ला, होडावडा. देवगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- देवगड, पडेल, पाटगाव. वैभववाडी तालुका खरेदी- विक्री संघामार्फत- वैभववाडी, करुळ. कणकवली तालुका खरेदी -विक्री संघामार्फत- कणकवली लोरे नं-१, घोणसरी, सांगवे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. मार्फत- ओरोस, कट्टा, मसुरे इत्यादी केंद्रावर धान खरेदी सुरु असून शासनाने पणन हंगाम २०२२-२३ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करिता शासनाकडून प्रति क्विंटल दर रु. २०४० जाहिर करण्यात आलेला आहे. शासनाकडून खरदी दिनांक ३१ जानेवारी २०२३ अखेर पुर्ण करण्याची सुचना आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'