अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा - दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी दि.03 (जि.मा.का): राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकिलो 3 रुपये तांदुळ, गहु रुपये 2 प्रतिकिलो या दराने अन्नधान्य वितरित करण्यात येते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील सुचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सदर अन्नधान्य मोफत वितरित करण्याबाबत कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'