थकीत कर्ज एकरकमी परतफेडकेल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत                                                           -प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी दि.02 (जि.मा.का):  जिल्ह्यातील इतर मागासवर्गीयवित्त विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ)यांचेमार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठीमहामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार महामंडळाकडूनघेतलेल्या मुदती कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज, मार्जिन मनी कर्ज सर्वयोजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50टक्के सवलत देण्यात येत, असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हाव्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली.            संबंधित कर्ज खातेधारकांनी  या योजना मर्यादीत कालावधीकरिता असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावीव आपले कर्ज खाते बंद करावे. लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्यारुपये 10 लक्ष कर्ज परतावा योजनेतंर्गत तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतायेईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग  02362 228119/866889950 या दूरध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'