व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके घेऊन जावीत

सिंधुदुर्गनगरी, दि.२५(जि.मा.का.): शैक्षणिक सत्र 2022 पर्यंतचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिसायनिंग, शिवण व कर्तन या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके अद्याप संस्थेतून घेऊन गेलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:चे ओळखपत्र व पासपोर्ट फोटो सोबत आणून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस व सार्वजनिक सुट्टीची दिवस वगळून घेऊन जावे. असे आवाहन टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्राशाळा तंत्र माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे. शैक्षणिक सत्र वर्ष 1995 पासून ते शैक्षणिक सत्र वर्ष 2021 पर्यंतचे वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठी सोबत आपले ओळखपत्र (आधारकार्ड) व पासपोर्ट साईज फोटो-2 आणून कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून स्वत: घेऊन जावे. टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व प्रमाणपत्र अभ्यासक्रमची नाव पुढीलप्रमाणे आहेत. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी (ऑटो इंजिनअरींग टेक्निशयन), इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (घरगुती विद्युत उपकरणांची निगा व दुरुस्ती) . कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी(कॉम्प्युटर टेक्निक). शिवण व कर्तन (1 वर्ष कालावधी अभ्यासक्रम) , गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिझायनिंग (1 वर्ष कालावधी अभ्यासक्रम). कार्यालयीन वेळ सकाळी 10 ते संध्या.5.45 वाजपर्यंत (सोमवर ते शुक्रवार) सकाळी 10 ते संध्या. 2 वाजेपर्यंत (शनिवार) कार्यालयीन साप्ताहिक सुट्टी रविवार रोजी.अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी संपर्क 02363-272073, प्रशिक्षण विभाग मो. नं.7798576769 या नंबर संपर्क करावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'