१८ वर्षे पूर्ण होणा-या व मतदारांनी ग्रामसभेमध्ये बीएलओ मार्फत किंवा व्होटर हेल्पलाईन किंवा NVSP मार्फत आगाऊ फॉर्म नं ६ भरण्याची सुविधा

सिंधुदुर्गनगरी दि.28 (जि.मा.का) : आगामी वर्ष २०२४ मधील लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने १ मे २०२३ रोजी आयोजित ग्राम सभेतील मतदार यादी वाचन कार्यक्रमांमध्ये सर्व लोकांनी उपस्थित रहावे व मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमात सर्व पात्र मतदारांनी नाव नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती करावी. दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणा-या व मतदारांनी ग्रामसभेमध्ये बीएलओ मार्फत किंवा व्होटर हेल्पलाईन किंवा NVSP मार्फत आगाऊ फॉर्म नं ६ भरण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त पात्र भावी मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. आगामी वर्ष २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यासाठी मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. मतदार यादी अधिक शुध्द करण्याकरिता दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द् झालेल्या मतदार यादीतील मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता त्यांची मतदार नोंदणीची कार्यवाही चालू आहे. यासाठी दिनांक १ मे २०२३ रोजी होणा-या ग्रामसभेच्या अजेंडयामध्ये दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीचे वाचन हा विषय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेली मतदार यादीसह ग्रामसभेच्या ठिकाणी उपस्थित रहाणार आहेत. मतदार यादीचे वाचन झालेनंतर सदर यादीतील मयत मतदारांची नांवे ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये घेऊन ठरावाच्या प्रतीच्या अनुषंगाने सदर मतदारांची मतदार यादीतून वगळणी करण्यात येणार आहे. तसेच नवमतदार नोंदणीचा कार्यक्रम, मतदार ओळखपत्रातील दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. तसेच वरीलप्रमाणे नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रासाठी तहसिलदार कार्यालय, येथे मतदार यादीचे वाचन नवमतदार नोंदणीचा कार्यक्रम व मतदार ओळखपत्रातील दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी भेटी देण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ८० वर्षावरील मतदारांची पडताळणी कार्यक्रम व ब्लर फोटोची दुरुस्ती कार्यक्रम चालू आहे. यामध्ये जे मतदार मयत आहेत त्यांची वगळणी, जे मतदार स्थलांतरित आहेत त्यांचा पत्ता बदल व ज्यांचे फोटो जुने किंवा सुस्पष्ट आहेत अशा मतदारांचे नवीन कलर फोटो गोळा करून मतदार यादी अधिक शुद्ध करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'