एनएसडीसी मार्फत २६ जून पर्यंत आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि.१२ (जि.मा.का.): एनएसडीसी यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे २६ जून पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहाय्यक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे. भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि.२१ फेब्रुवारी २०२३ ते दि.२८ जून २०२३ यादरम्यान नॅशनल स्कीलडेव्हलपमेंट कॉर्पेारेशन (एनएसडीसी) यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. या रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. एनएसडीसी या डिजीटल प्लँटफॉर्मवर विद्यार्थी आणि नियोक्ते यांची नोंदणी,दि. २१ फेब्रुवारी २०२३ ते ९ एप्रिल २०२३, २५,००० उमेदवारांची नोंदणी आणि १०,००० आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी. स्क्रिनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाईन, दि.१० ते दि १६ एप्रिल २०२३ रोजी . उमेदवार ऑनलाईन मॅपिंग दि. १ ते ७ मे २०२३ रोजी भारतातील विविध शहरांमध्ये प्राथमिक फेऱ्या दि. १५ ते दि. ३० मे २०२३, १२,००० उमेदवारांना संधी. संपुर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फेऱ्या दि. ३१ मे ते दि. ८ जून २०२३,५००० उमेदवारांना संधी. समारोप समारंभ,उच्च अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार दि. २८ जून २०२३, २,००० अंतिम आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी. रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर नोंदणी करावी. https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ तसेच विविध कंपन्या, उदयोजकांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावयाची आहे. https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/international/company/ अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, येथे किंवा दूरध्वनी क्र.०२३६२,२२८८३५ वर संपर्क करावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'