महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : महात्मा फुले जयंतीनिमित्त शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जोवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर रांगोळी स्पर्धा महात्मा ज्योतिषा फुले यांच्या जीवन व विचारांवर वक्तृत्व स्पर्धा मी सावित्रीबाई बोलतेय किवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व महाविद्यालये तसेच वसतिगृह आश्रमशाळा यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेमार्फत 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सवात साजरी करण्याचा मानस आहे. त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करणेत येणार आहे.
00000
Comments
Post a Comment