बाल विवाह रोखण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधा - उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.): अक्षय्य तृतीया हा महत्वाचा मुहूर्त २२ एप्रिल २०२३ रोजी असल्याने या शुभमुहूर्तावर देशात मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.तरी बाल विवाह होत असल्यास त्याबाबची माहिती चाईल्ड लाईन हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ किवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ क्रमांवर द्यावी,असे आवाहन सामान्य प्रशास विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी केले आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे यामध्ये मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होण्याअगोदर झालेला विवाह बालविवाह समजला जातो. त्यानुसार विवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. आणि या मुहूर्तावर सामुदायिक किवा एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय्य तृतीया मुहूतावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि तो गुन्हा नोंदविणे जाणे अपेक्षित आहे. अशा गुन्ह्यात एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. तसेच बालविवाहत सहभागी होणे, प्रोत्साहन देणे यासाठी देखील या कायद्यात शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका तसेच सरकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ता यानी जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याकरिता जनजागृती करावी व योग्य ती खबरदारी घ्यावी आणि बालविवाह झाल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच लग्न हॉल, विवाह संस्था इत्यादी ठिकाणी पुरोहित, मोलाना यांनी वधुवर यांचे जन्मतारीख बाबत खात्री करावी. असे आदेश उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिले आहेत.
Comments
Post a Comment