महिला आर्थिक विकास महामंडळ कडून २२ पुरुषांना सुधारक सन्मान पुरस्कार प्रदान
सिंधुदुर्गनगरी दि.30 (जि.मा.का):- कुडाळ तालुक्यातील २२ गावातील पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते सुधारक सन्मान पुरस्कार व चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास विभाग- (महाराष्ट्र शासन अंगिकृत) नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प द्वारा स्वाधार लोकसंचलीत साधन केंद्र कुडाळ जेंडर व न्यूट्रिशियन घटकांतर्गत तालुकास्तरीय पुरुष सुधारक सन्मान वितरण कार्यक्रम नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे झाला.
यावेळी नाबार्ड चे जिल्हा महाप्रबंधक अजय थुटे महिला आर्थिक विकास महामंडळ च्या लेखाधिकारी आशालता जमने, स्वाधार लोकसंचलीत साधन केंद्र कुडाळ अध्यक्षा मानसी धुरी, उपाध्यक्षा स्वाती मांजरेकर सचिव राजेश्वरी कुडाळकर, स्वाधार संस्थेच्या व्यवस्थापिका प्रीतम केरवडेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहारा अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र, कुडाळ द्वारे जे पुरुष समाजात स्त्रियांना समानतेने वागवितात महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पुरुषांच्या या योगदानाबद्दल त्यांचा देखील सन्मान व्हावा, या हेतूने सुधारक सन्मान देण्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र,यांनी आयोजन केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ च्या लेखाधिकारी श्रीमंती जमने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.नाबार्ड चे जिल्हा महाप्रबंधक श्री. थुटे यांनी मार्गदर्शन केले. व्यवस्थापक श्रीमती केरवडेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. *सोबत फोटो जोडला आहे.
०००००
Comments
Post a Comment