क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिर
सिंधुदुर्गनगरी दि.27 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे दिनांक १ ते ८ जुन २०२३ या कालावधीत होणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीरास सर्व क्रीडा शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्या शिरस यांनी केले.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार, व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भुमिकेतुन राज्याचे क्रीडा धोरण २०१२ घोषित करण्यात आलेल आहे. या क्रीडा धोरणातील मुद्दा क्र.६ (५) नुसार खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळाची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे.
तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विदयार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अदयावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी अद्ययावत क्रीडा धोरण सन २०१२ तयार करण्यात येऊन त्याच्या अंमलबजावणी साठी दिनांक १४ जून २०१२ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजन शासन निर्णय दि. २८ एप्रिल २०१४ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच सदर प्रशिक्षण शिबीराच्या आवश्यक त्या माहितीसाठी श्याम देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी, कणकवली यांना संपर्क साधावा (संपर्क क्र. ९७३००१००८५) .
०००००
Comments
Post a Comment