मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ‘आनंदाचा शिधा’ प्राप्त लाभार्थ्यांशी संवाद साधणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा व अन्य योजनांच्या लाभार्थ्याशी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री दि. 13 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे. उद्दिष्ट :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होत आहे किंवा कसे, याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे तसेच रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी/समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे. संवादासाठी निवडण्यात आलेल्या योजना:- "आनंदाचा शिधा" संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) व शिवभोजन थाळी या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे 50 लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणार आहेत. संबंधित लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी मधील व्हीसी रुममध्ये उपस्थित राहतील. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'