महिला आर्थिक विकास महामंडळ कडून सावंतवाडी तालुक्यातील २६ पुरुषांना सुधारक सन्मान पुरस्कार प्रदान

*सिंधुदुर्गनगरी दि.30 (जि.मा.का):- सावंतवाडी तालुक्यातील २६ पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते सुधारक सन्मान पुरस्कार व चिन्ह देऊन गौरविण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बाल विकास विभाग (महाराष्ट्र शासन अंगीकृत) सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोक संचलित साधन केंद्र, सावंतवाडी अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प (नव तेजस्विनी) द्वारा जेंडर व न्युट्रीशन घटकांतर्गत तालुकास्तरीय पुरुष सुधारक सन्मान वितरण कार्यक्रम आदिनारायण मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे नुकताच झाला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकारी आशालता जमने, महिला व बाल विकास समुपदेशन केंद्राच्या अर्पिता वाटवे, माहेर लोक संचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा नम्रता झारापकर, माहेर लोक संचलित साधन केंद्राच्या कोषाध्यक्षा भक्ती दळवी, माहेर लोक संचलित साधन केंद्र , सावंतवाडी च्या व्यवस्थापिका वैष्णवी नाईक तसेच माविम मित्रमंडळ आदी उपस्थित होते. सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. माहेर लोक संचलित साधन केंद्राच्या स्टाफ ने माविम प्रार्थना करून कार्याक्रमाची सुरुवात केली. महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोक संचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारा जे पुरुष समाजात स्त्रियांना समानतेने वागवितात, समाजाप्रती कार्य करतात. आशा पुरुषांच्या या योगदानाबद्दल त्यांचा देखील सन्मान व्हावा, या हेतूने सुधारक सन्मान व्हावा या हेतूने सुधारक सन्मान देण्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माहेर लोक संचलित साधन केंद्र यांनी आयोजन केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकारी आशालता जमने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. अर्पिता वाटवे यांनी स्त्री-पुरुष समानता या विषयी मार्गदर्शन केले. व्यवस्थापक वैष्णवी नाईक यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'