शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ - सहायक आयुक्त संतोष चिकणे

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : सन 2022-23 करीता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्यासाठी महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी पाठविण्यासाठी दि.30 एप्रिल अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली . भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रीया आपले सरकार पोर्टलवरील https://mahadhtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी दि. 30 एप्रिल पर्यंत कार्यवाही करावी.ज्यार विद्यार्थ्यां चे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत. अशा विद्यार्थ्या चे अर्ज संबंधित महाविद्यालयानी नोंदणी करुन शिष्यावृत्तीथ अर्ज मंजुरीसाठी पाठविण्याहत यावे. शिष्यआवृत्ती् अर्ज भरणे व मंजुरीसाठी पाविण्याशची दि. 30 एप्रिल 2023 ही अंतिम मुदत असल्या्ने या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याभसयास संबंधित महाविद्यातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. शिष्यलवृत्तीन योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्याव अर्ज नुतनीकरण करण्या बाबत समस्या अद्भवल्याेस अधिक माहितीसाठी समाज कल्याोण कार्यालय दूरध्वयनी क्र.02362- 228882 येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभगाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'