पर्यटन जिल्ह्यात पोलिसांनी पर्यटकांशी सौजन्यपूर्ण राहून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी,दि.11 (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल. अशी अपेक्षा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. सुरुवातीला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये मनुष्यबळ,गुन्ह्यांची उकल, पोलीस दलाकडे असणारी साधन-सामग्री, महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजना, सागरी पोलीस ठाण्यांकडे असणारी साधन-सामग्री, रिक्त पदे, रेस्कू ऑपरेशन, नवी पर्यटन पोलीस योजना, कॅराव्हॅन, सागर किनारी गस्ती नौका आदीबाबत सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पोलीस दलाने प्रलंबित सायबर गुन्ह्यांची उकल करावी. जिल्हा शंभर टक्के सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहनियंत्रणाखाली आणण्यासाठी लोकसहभागाची मदत घ्यावी. त्याबाबत नियोजन करावे. लोकसहभागामुळे जनजागृती होवून चांगला परिणाम होवू शकतो. पोलीस दलाला आवश्यक असणाऱ्या वाहनांसाठी निश्चितपणे निधी दिला जाईल. त्यासंदर्भात प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव पाठवावेत. सायबर गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत असते. असे प्रलंबित गुन्हे मार्गी लावावेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल. या बैठकीला पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'