तिमाहीचे ई-आर 1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे - प्र. सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे
सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे मनुष्यबळाचे मार्च 2023 या तिमाहीचे ई- आर 1 हे विवरणपत्र 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय, नियशासकीय, खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर -1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे.
दिनांक 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाईचे विवरणपत्र ई आर -1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर दि. 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईन व्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362- 228835 वर संपर्क साधावा, असे आवाहन ही श्री. बिटोडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment