सामाजिक न्याय पर्वानिमित्त करियर मार्गदर्शन शिबीर व अंधश्रध्दा निर्मूलन कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.24 (जि.मा.का):- सामाजिक न्याय पर्वानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे दि. 23 एप्रिल रोजी करियर मार्गदर्शन शिबिर, अनु. जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ व अंधश्रध्दा निमूर्लन कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग व पंचशिल ट्रस्ट ओरोस व के. सौ.रुणी फटू मठकर चॅरीटेबल ट्रस्ट, वेंगुली यांच्या संयुक्त विद्यामानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, सेवानिवृत्त अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालय संजय खोटलेकर, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या हस्ते ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करणेत आले. त्यानंतर उपस्थित नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनीना करीअर विषयी अच्युत देसाई, युनिक अॅकडमी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी अंधश्रद्धे विषयी प्रात्यक्षिके उपिस्थितांसमोर सादर करून अंधश्रद्धा निर्मूलनबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास संजय खोटलेकर, समाज भूषण प्राप्त व नामदेव मठकर, सामाजिक कार्यकर्त तथा सेवानिवृत्त अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग समाज कल्याण विभागातील अनिल बोरीकर, सुनिल बागुल, संतोष परूळेकर, रविंद्र जाधव, कुणाल इंदलकर, गृहपाल, आरती सावंत, संदेश कसालकर, कलिंगण, नैतिक वाघाटे, काशिराम कदम, , नंदकिशोर सावंत, दिपक चव्हाण तसेच जिल्हयातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी-कर्मचारी वर्ग व समतादूत उपस्थित होते. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'