जिल्ह्यातील 300 पेक्षा अधिक खेळाडुंनी विविध खेळांचे गिरवले धडे

सिंधुदुर्गनगरी दि.28 (जि.मा.का) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दिनांक 17 ते 27 एप्रिल कालावधीत घेण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध खेळांच्या प्रशिक्षणामध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळीपासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढू शकतो. शारीरिक क्षमता, सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मल्लखांब व बास्केटबॉल या खेळाचे प्रशिक्षण शिबिर जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण येथे आयोजित करण्यात आलेले होते. सदर शिबिर हे सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब असोसिएशन व बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शांताराम जोशी, रणवीर सावंत व दिनेश चव्हाण यांनी घेतले. बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे खजिनदार एकनाथ चव्हाण, स्वप्नील चव्हाण व महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत वावळ यांनी घेतले. कबड्डी या खेळाचे प्रशिक्षण राष्ट्रीय खेळाडू ॲलीक्सा अल्मेडा यांनी जिमखाना स्टेडीयम नगरपरिषद, सावंतवाडी येथे घेतले तर वेटलिप्टींग या खेळाचे प्रशिक्षण विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी वेंगुर्ला व संजय पेंडुरकर यांनी वराडकर हायस्कूल कट्टा येथे आयोजित करण्यात आले. बुध्दीबळ खेळाचे प्रशिक्षण श्री चेस अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यामाने श्रीकृष्ण आडेलकर यांनी ऑनलाईन प्रशिक्षण दिले. कॅरम या खेळाचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन चे राष्ट्रीय पंच व सचिव योगेश फणसळकर तसेच त्यांचे सहकारी प्रतिक बांदेकर, रोहन राजाध्यक्ष व राजेश निर्गुण यांनी पंचम खेमराज हायस्कूल, सावंतवाडी या ठिकाणी घेतले. कराटे या खेळाचे प्रशिक्षण कासार्डे हायस्कूल कणकवली येथे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेश गाडे व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन चे सचिव दत्तात्रय मारकड यांनी घेतले. ॲथलॅटिक्स या खेळाचे प्रशिक्षण ताराचंद पाटकर एन.आय.एस. कोच यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे घेण्यात आले. सदरचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच शाम देशपांडे तालुका क्रीडा अधिकारी कणकवली, विजय शिंदे तालुका क्रीडा अधिकारी वेगुर्ला व मनिषा पाटील क्रीडा अधिकारी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हाभर संपन्न झाली. * सोबत फोटो जोडला आहे. 00000 क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिर तारीख व ठिकाणात बदल सिंधुदुर्गनगरी दि.28 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे दिनांक १ ते ८ जून या कालावधीत शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हे शिबिर यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी येथे दिनांक १५ ते २२ जून २०२३ या कालावधीत होणार आहे. सर्व क्रीडा शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा. राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार, व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण २०१२ घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणानुसार खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्ययावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी अद्ययावत क्रीडा धोरण सन २०१२ तयार करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीसाठी दिनांक १४/०६/२०१२ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजन शासन निर्णय दि. २८/०४/२०१४ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सदरचे तसेच सदर प्रशिक्षण शिबीराच्या आवश्यक त्या महितीसाठी श्याम देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी कणकवली यांना संपर्क साधावा (संपर्क क्र.९७३००१००८५) 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'