हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला व देवगड चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी दि.28 (जि.मा.का): राष्ट्रीय आरोग्य अभियान 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये 8 शहरी आरोग्य केंद्रे मंजूर आहेत. दिनांक 1 मे रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला व देवगडचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागातील राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोयीसुविधा मिळण्याकरिता, दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्वक व आरोग्य गुणवतापूर्वक सेवा पुरविण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची स्थापना शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला व देवगड येथे करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये पुढीलप्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. बाहयरुग्ण सेवा वेळ दुपारी 2. ते रात्री 10. मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलिकन्स्लटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व तज्ञ उपस्थित राहतील. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक (पुरुष) तसेच या केंद्रामध्ये उपरोक्त सेवा व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. महिन्यातून निश्चित दिवस नेत्र तपासणी बाह्ययंत्रणेव्दारे रक्त तपासणीची सेवा, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाची सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिनांक-1 में 2023 रोजी होणाऱ्या डिजिटल उद्घाटन सोहळ्यास सर्व नागरिकांना उपस्थित राहणेबाबत तसेच शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये सर्वांची आरोग्य तपासणी करून घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केलेले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'