ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदानासाठी भरपगारी सुट्टी -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का): जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, दि. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ग्रामपंचायतीतील निधन, राजीमाना, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीच्या 172 जागांसाठी पोट निवडणुका घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाच्या दिवशी 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. पासून सायं. 5.30 वा. पर्यंत हा कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका जेथे नियोजित आहेत, तेथे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत देण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सबब मतदारांना दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान करणेकरिता भरपगारी सुट्टी / विशेष सवलत जाहीर करण्यात येत आहे.
00000
Comments
Post a Comment