भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि .14 (जि.मा.का) सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षिणीक वर्षाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व अर्ज नुतनीकरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासठी ३१ जानेवारी २०२२ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज करावीत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर अर्ज व प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्‍याचे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'