अरुणा प्रकल्पातून 3 डिसेंबर रोजी होणार विसर्ग नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी - कार्यकारी अभियंता ह.ग.लवंगारे

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का): अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. सन 2021-22 च्या हंगामात धरणाचे उर्वरीत काम करण्याकरिता साठा करण्यात आलेले पाणी सिंचन विमोचकाद्वारे नदी पात्रात उद्या 3 डिसेंबर सकाळी 8 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी नदी पात्रात उतरू नये, सावधानता बाळगावी असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता ह.ग.लवंगारे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'