नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का): नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्री. बर्गे हे यापूर्वी 2009 ते 12 या कालावधीत जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून होते. हिंगोली येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी सिंधुदुर्ग येथील पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'