जिल्ह्यात 5 लाख 60 हजार 966 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.17(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 966 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 191 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 934 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 35 हजार 686 व्यक्तींनी पहिला डोस तर 99 हजार 302 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 60 हजार 830 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 20 हजार 191 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 44 हजार 604 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 58 हजार 919 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 9 लाख 56 हजार 503 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 10 लाख 60 हजार 500 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 8 लाख 16 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख 44 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 7 लाख 57 हजार 931 कोविशिल्ड आणि 1 लाख 98 हजार 572 कोवॅक्सिन असे मिळून 9 लाख 56 हजार 503 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 लाख 32 हजार 180 लसी उपलब्ध असून त्यापैकी 93 हजार 700 कोविशिल्डच्या आणि 38 हजार 480 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 20 हजार 600 लसी शिल्लक असून त्यापैकी 7 हजार 400 कोविशिल्ड आणि 13 हजार 200 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'