शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु -सहायक आयुक्त दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी दि.3(जि.मा.का): सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण,कणकवली, व वेंगुर्ला तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे एकूण 08 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मागासवर्गीय गरजू व वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेंचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी पासून पुढील वर्ग सुरु झाले असल्याने, मागासवर्गीय मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकृती करण्यात येत आहेत. जिल्हयातील विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाचे अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतीगृहातील गृहपाल व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग 02362 228882 या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'