ई- संजीवनी ओपीडीचा लाभ घेण्याचे जिल्हावासीयांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि.24(जि.मा.का): जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाचे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शन सल्ला दिला जातो. ई-संजीवनी ॲपवर टेलिकन्सल्टेशनव्दारे वैद्यकीय अधिकारी गरजू व कोविड रुग्णाना वैद्यकीय सल्ला देतात.
ई संजीवनी ओपीडी ही सेवा ऑनलाईन असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाकडे ॲड्राईड मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. ही सेवा www.esanjeevniopd.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लॅपटॉप व संगणकावरुन घेता येते. सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यत, तर दुपारी 1.30 ते 5 यावेळी उपलब्ध आहे. रविवार सुध्दा ही सुविधा उपलब्ध आहे. सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना ॲड्रोईड मोबाईलव्दारे या ई- संजीवनी ओपीडी या संकेस्थळावर किंवा ई- संजीवनी ओपीडी हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टॉल करुन नोंदणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेता येतो. डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर सल्ला मसलत झाल्यानंतर ई- प्रिस्किप्शनही दिले जात आहे.
या संजीवनी ओपीडी चा लाभ घेण्यसाठी पुढील टप्पाचे पालन करावे. सेवा नोंदणी करुन टोकन घेणे- मोबाईल क्रमांकाव्दारे नोंदणी केल्यावर ओटीपी येता. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो,त्यानंतर टोकनसाठी विंनंती केल्यानंतर आजारासंबंधी कागदपत्रे रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसव्दारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगीईनसाठी एसएमसव्दारे नोटीफिकेशन येतो. रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगीईन करता येते वेटींग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच‘ कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित होते. त्यानंतर व्हिडीओ कॉलव्दारे डॉक्टरांशी चर्चा केली जाते. चर्चेनंतर लगेच ई- प्रिस्किप्शन प्राप्त होते.
तरी या सेवेसाठी नेट कनेक्टीव्हिटी चांगली असावी . त्यामुळे या सेवेचा लाभ रुग्णाना ऑनलाईन घेता येतो. ही सुविधा जिल्ह्यात सुरु झाल्यापासून आतापर्यत 330 रुग्णानी लाभ घेतला आहे. ही सुविधा विनामुल्य उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी ई -संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिक्रत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment