इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.3 (जि.मा.का): सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन परीक्षामध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यामधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दिनाक 1 डिसेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. परिक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीत -जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रविष्ठ व्हावे व आवेदन पत्र भरण्यासाठी आपल्या शाळेच्य मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. मुश्ताक शेख शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'