मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.3(जि.मा.का): भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील महाविद्यालय स्तरावर स्कॉलरशिपचे तांत्रिक त्रुटीमुळे प्रलबंधित असलेले अर्जाचा प्रस्ताव 9 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावित असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन 2011-12 पासून Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात होता. ही ऑनलाईन प्रणाली सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून शासन स्तरावरुन बंद केली आहे. प्रणालीवरील सन 2011-12 ने 2016 -17 या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज सन 2017-18 मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज तसेच सन 2017-18 मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादद केलेले आहे. परंतु एखादा विद्यार्थी राहून गेलेला आहे. अशा महाविद्यालयांनी प्रस्ताव या कार्यालयास 9 डिसेंबर2021 पर्यत सादर करावित. जिल्ह्यातील महाविद्यालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैठकामध्ये, कार्यालयांकडून वारंवार केलेला प्रत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्यातबाबत सूचना करण्यात आले आहे. सन 2011-2012 ते सन 2017-18 या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'