माजी सैनिक, विधवांना पेन्यूरी अनुदान नूतनीकरण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का): सन 2021- 22 करिता पेन्यूरी अनुदान नूतनीकरण्यासाठी माजी सैनिक, विधवा 65 वर्षावरील आहेत, ज्यांना कोणतेही निवृत्ती वेतन, इतर सरकारी अनुदान मिळत नाही. अशा लाभार्थीनी अनुदान पुढे चालू ठेवण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने दिनांक 1 मार्च 2022 पर्यंत के.एस.बी या वेबसाईट वर जाऊन नुतनीकरण करुन घेण्यात यावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
पेन्यूरी अनुदान नूतनीकरण करण्यासाठी पुढील प्रमाणे मूळ कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहेत.
हयातीचा दाखला(जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या सहीनिशी.). बँक पासबुकचे पहिले पान ज्यामध्ये बँकेचा IFSC Code असणे आवश्यक आहे. आधार कार्ड. डिसचार्ज पुस्तक.या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी सर्व माजी सैनिक, विधवा यांनी ऑनलाईन पध्दतीने नुतनीकरण करावे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क करावा. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment