औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): सन 2022-23 करिता कायम विना अनुदान तत्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे आणि विद्यमान खाजगी औ. प्र.संस्थांमध्ये नवीन व्यवसाय, जादा तुकडीवाढ, व्यवसाय बदल करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची संचालनालयाचे पोर्टल http://vti.dvet.gov.in वर दि.9 डिसेंबर ते दि 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. औ. प्र. संस्‍थाना किमान 04 व्‍यवसाय अभ्‍यासक्रम व 8 तुकड्या सुरु करणे बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. त्‍यातील किमान एक व्‍यवसाय अभियांत्रिकी, आणि एक व्यवसाय न्यू एज/Industry4.0 आवश्यक असल्याने काही संस्थांना या निकषानुसार अर्ज करता आला नाही . दि 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान सन 2022-23 करिता काही संस्थांची सर्व तयारी असून देखील संस्था अर्ज करण्यात इच्छुक असूनही पोर्टल बंद असल्याने अर्ज करु शकले नाहीत. अशी माहिती रमण पाटील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली . 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'