ऑनलाईन रोजगार मेळावा 21 डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.20(जि.मा.का): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि.12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन State Level "MEGA JOB FALR" चे आयोजन करण्यात आले होते, आता याचह मुदत ही 21 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडित दीनद्याळ उपाध्याय स्टेट लेवल "MEGA JOB FALR" मध्ये आपली रिक्तपदे welder,fitter,Traub Operator, Machine Opertor,Sales Executive,Back Office DTP Operator, Telecalling, Service Advisor,Manager, Workshop Manager, Supervisor,Guard इ. अधिसुचित केलेली आहेत. जिल्‍हयातील नोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे,या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शालिक पवार सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'