बैलांमधील वेदनारहित खच्चीकरणाचे प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.21 (जि.मा.का): महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने ॲनिमल राहत या संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना मानवीय पध्दतीने बैलांमधील खच्चीकरण प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. अशाप्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम या पूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोल्हापूर, रत्नागिरी ,जळगांव,उस्मानाबाद, बीड, लातूर ,औरंगाबाद, परभणी,आणि जालना, जिल्ह्‌यात आयोजित करण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक उर्वरित जिल्ह्यात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मानवीय पध्दतीने हाताळणी आणि बैलांना काबू करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. उपशामक, वैदनाशामक आणि निस्तेजक औषधांचा एकत्रित वापर करुन,बैलांना खच्चीकरुणापुर्वी भूल दिले जाते. खच्चीकरणानंतर वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी वेदनाशामक औषधाने उपचार केले जातात. प्रशिक्षणामध्ये सादरीकरण क्षेत्र वेदनारहित खच्चीकरणाची पध्दत पशुसंवर्धन विभागाच्या प्रगत पध्दती व मानवी पध्दतीचा अवंलब करण्यसाठी हितकारक ठरेल. कोणत्याही पशु हिंसक प्रक्रियेला भविष्यात सामोरे जाणार नाही.प्रात्यक्षिक आणि अपक्व खच्चीकरणाची सध्याची प्रचलिंत पध्दत बदलण्याचा उद्देश आहे. असे ॲनिमल रहातचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नरेश उप्रेती सांगतात. पशुसंवर्धन विभाग,कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा दुग्धोत्पादन व मस्त्यपालन,विभाग तसेच भारतीय प्राणी कल्याण मंडळ, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा दुग्धोत्पादन व मस्त्यपालन, विभाग तसेच भारतीय प्राणी कल्याण मंडळ, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे सल्लागार मंडळ यांनी वेदनारहित खच्चीकरणाची पध्दत मान्य केली आहे. वळूंचे खच्चीकरण कोणत्याही वेदनाशामक उपाय योजने शिवाय करणे हि पध्दत प्राणी क्रुरता अधिनियम 1960 अंतर्गत येते. या प्रशिक्षणासाठी प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुबई विभागाचे डॉ. सुभाष मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आर. बी दळवी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सिंधुदुर्ग, डॉ.वाय.डी.गोसावी सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कणकवली जानवली, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉ. ङि अे. शिपी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय,सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यात ॲनिमल राहतचे डॉ. चेतन यादव क्लीनीकल क्वालीटी ॲश्युरन्स मॅनेजर व वरिष्ठ प्राणी कल्याण अधिकारी श्री. सुनिल हवालदार यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती डॉ. आर.बी. दळवी जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'