पावसाची नोंद & कंटेन्मेंट झोन

 मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 09 गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 28 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.

       दोडामार्ग - 12 (4220), सावंतवाडी - 6 (4459), वेंगुर्ला - 31.40 (3700.60), कुडाळ - 18 (3862.55) मालवण - 62 (4754), कणकवली - 53 (3720), देवगड - निरंक (3241), वैभववाडी - 45 (3825) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

00000

वृत्त क्र. 1243

कणकवली शहरातील हर्णेआळी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 09 कणकवली तालुक्यातील मौजे कणकवली शहर येथील हर्णेआळी येथे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, नागरिकांचे येणे-जाणे तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक विकरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ.सेवा देणारे कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत.

       सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चेकलम 71, 139, तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

00000    

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'