कणकवली तालुक्यातील मौजे- फोंडा बाजारपेठ, भोगटेचाळ ते ग्रामपंचायत, विद्यानगर, कोरगावकरवाडी, बिजलीनगर वपिंपळवाडी येथे कंटेन्मेंट झोन/ देवगड तालुक्यातील मौजे- जामसंडे बाजारपेठ, वेळवाडीटापू व मौजे- शिरगाव वरचीवाडी येथे कंटेन्मेंट झोन / बचत गटातील महिलांसाठी ऑनलाईन उखाणे स्पर्धा
कणकवली तालुक्यातील मौजे- फोंडा बाजारपेठ,
भोगटेचाळ ते ग्रामपंचायत, विद्यानगर,
कोरगावकरवाडी, बिजलीनगर व
पिंपळवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 3 : कणकवली तालुक्यातील मौजे- फोंडा बाजारपेठ 700 मीटर, भोगटेचाळ ते ग्रामपंचायत, विद्यानगर, कोरगावकरवाडी, बिजलीनगर 300 मीटर व पिंपळवाडी या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
देवगड तालुक्यातील मौजे- जामसंडे बाजारपेठ, वेळवाडीटापू व
मौजे- शिरगाव वरचीवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 3 : देवगड तालुक्यातील मौजे- जामसंडे बाजारपेठ, वेळवाडीटापू परिसर व मौजे शिरगाव वरचीवाडी येथील परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
सुधारित बातमी
बचत गटातील महिलांसाठी
ऑनलाईन उखाणे स्पर्धा
सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि. 3 : उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी गणपती आणि येणाऱ्या नवरात्र सणानिमित्त महिला बचत गटातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समन्वय अधिकारी नितिन काळे यांनी दिली.
स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली राहील. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी नाविण्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिय असणारे तसेच काही ऐतिहासिक मूल्य असणारा, दीड ते जास्तीत-जास्त तीन मिनिटांचा उखाण्याचा व्हिडीओ तयार करून महिला आर्थिक विकस महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे 10 सप्टेंबरपर्यंत पाठवावा.
उखाणे निवडीचे निकष -उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणा हा मौखिक साहित्यिक प्रकार असला तरी त्यातील आशय हा फक्त प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. आपण सर्वसाधाणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्पर्धेत आपल्याला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड-19 काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा स्त्री- पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत-जास्त तीन मिनीटांचा लांब असावा. उखाणा मुखोदगत /पाठ असावा.
प्राप्त उखाण्याची जिल्हास्तरावर परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे 3 व माविमेत्तर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ विभागीय स्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा 6 याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीय स्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे 3 व माविमेत्तर महिलांचे 3 असे 6 व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. 36 पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्या महिलांचे क्रमांक काढले जातील. विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल आणि राज्यस्तरीय विजेत्या 6 महिलांना राज्य साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठी संधी देण्यात येर्इल.
अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे 7798836342 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व sindhudurg.mavim@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment