निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धकरण्याबाबत सूचना
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी प्राश्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सुधारित सूचना दिल्या आहेत. सदर सूचना पुढील प्रमाणे आहेत.
उमेदवारांनी, तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर पुढील प्रमाणे प्रसिद्ध करावयाचा आहे. प्रथम प्रसिद्धी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या चार दिवसांमध्ये, दुसरी प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या 5 व्या ते 8 व्या दिवसांमध्ये, तिसरी प्रसिद्धी 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच मतदान होण्याच्या दोन दिवस आगोदर. हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकारी चांगल्या माहितीच्या आधआरे उपयोगात आणण्यास मदत करेल. बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय यांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षांसाठी निश्चित केल्या प्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील. आयोगाने ठरविल्यानुसार, आता पर्यंत प्रसिद्ध करणअयात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन भागधारकांच्या हितासाठी प्रकाशित केले जात आहे. हे मतदार व इतर भागधारकांमधअये अधिक जागरुकता निर्माण करण्यात मदत करेल. यासंदर्भातील सर्व सूचना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशित करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजेत. या सुधारित सूचना तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड हे कळवितात.
00000
Comments
Post a Comment