कोविड उपचारांबाबत खाजगी रुग्णालयांची
बुले तपासणीसाठी समिती नियुक्त
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 17 : कोविड - 19 च्या बाधीत रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणार्या बीलांची तपासणी करण्यासाठी व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनांचा लाभ या बाबतची तपसाणी करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर हे आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे हे सदस्य सचिव व जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी नितीन सावंत हे सदस्य आहेत. याबाबत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.
000000
Comments
Post a Comment