जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवा - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष कार्यरत
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का)
दि. 16 : जिल्हा
रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के.
मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हा
सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.
शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दारे व खिडक्या तातडीने
दुरुस्त कराव्यात, विशेषतः महिला वॉर्डमधील दुरुस्ती तातडीने करून घ्यावी. सर्व
रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गिजर बसविण्यात यावेत, स्वच्छ
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थंड व गरम असे दोन्ही प्रकारचे पाण्याचे
फिल्टर बसवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात
आला असून कोविड संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास तसेच द्यावयाची असल्यास 1077
या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
यांनी केले आहे.
* सोबत फोटो जोडले आहेत.
00000



Comments
Post a Comment